Saturday 16 June 2012

घराचा फिटनेस



 
 
 
 
आपल्या सर्वांच्याच मनात घराची तीव्र इच्छा असते, ते एक असं सुरक्षित ठिकाण असतं जिथे आपण जसे आहोत तसे जाऊ शकतो, तिथे आपल्याला कुठलेही प्रश्न विचारले जात नाहीत... माया अँजेलो

या आफ्रिकी समाजवादी विचारवंताच्या भावना आपल्या चार भिंतींविषयीच्या भावना अचूकपणे व्यक्त करतात, ज्याला आपण घर म्हणतो. मात्र आपलं हे घर किती सुरक्षित आहे, हा प्रश्न आपण स्वतःला क्वचितच विचारतो! या लेखाचं शीर्षक वाचूक बरेच जण बुचकळ्यात पडतील, कारण फिटनेस हा शब्द आपण जिवंत प्राण्यांसाठी वापरतो. मग विटां, काँक्रिटनी बनलेल्या घरासाठी फिटनेस हा शब्द कसा वापरता येईल?

त्यासाठी आधी आपल्याला बहुतेक लोकांचा त्यांचा घराविषयी कसा दृष्टीकोन असतो हे पाहावं लागेल. आपण कुठल्याही घराला चांगले घर म्हणताना त्याचा सौंदर्यदृष्टीने विचार करतो म्हणजे त्याची अंतर्गत सजावट, रंगसंगती, फर्निचर इत्यादी. मात्र आपण क्वचितच घराची मजबुती किंवा टिकाउपणाकडे लक्ष देतो. माझा बहुतेक घर खरेदी करणा-यांविषयीचा अनुभव आहे की खरेदी करताना किंवा घर खरेदी केल्यानंतरही या विषयात त्यांना फारसे स्वारस्य नसते. फार क्वचित मला कुणी काँक्रिटची ताकद किती आहे, कुठल्या प्रकारचे सिमेंट वापरले आहे, घराच्या बांधकामाचा आराखडा किती मजबूत आहे असे प्रश्न विचारले आहेत. कृपया लक्षात असू द्या की असे प्रश्न विचारण्यासाठी आपण अभियंते असायची गरज नाही. आपण एखादी कार किंवा दुचाकी खरेदी करताना किती सीसीचं इंजिन आहे, मायलेज किंवा ऍव्हरेज किती देते असे प्रश्न विचारतो, मात्र जेव्हा घर खरेदी करायची वेळ येते तेव्हा आपण आपल्या उत्सुकतेकडे कानाडोळा करतो! मला खरोखर प्रश्न पडतो की घरासारखी गोष्टी जी तुमच्या अनेक पिढ्या उपयोगी पडणार आहे, ती खरेदी करताना बहुतेक ग्राहकांना काय होतं, या गोष्टींमध्ये आपल्याला अजिबात स्वारस्य नसतं, मात्र याच बाबी पुढे जाऊन आपल्या घराचा फिटनेस ठरवतात!
घर मजबूत व टिकाऊ असेल तरच आपल्याला त्याची कमीत कमी देखभाल करावी लागेल. घराच्या आराखड्यामध्ये काँक्रिटची मजबुती व्यवस्थित हवी, त्याची देखभाल व्यवस्थित व्हायला हवी, दगडी काम, दरवाजे व खिडकीच्या चौकटी भक्कमपणे बसवलेल्या पाहिजेत, ज्यामुळे बांधकाम एकसंध होईल. अंतर्गत सजावट व रंग चेह-यावरील मेकअपप्रमाणे आहेत, मात्र घराची त्वचा आणि snaayaU मजबूत असतील तरंच ते चांगलं दिसेल याकडे आपण दुर्लक्ष करतो. अनेकदा आपण नव्या घरांच्या भिंतींनाही तडे गेलेले पाहतो व विचार करतो की याचं काय कारण आहे? आपल्या शहरात प्लास्टरचं बहुतेक काम रेतीनं केलं जातं व त्यामध्ये बरीचशी माती असते. त्यामुळेच आजूबाजूच्या तापमानात झालेल्या बदलांनी भिंतींना काही दिवसांनी तडे जातात. हे तडे बांधकामाच्या दृष्टीने गंभीर असतात असं नाही मात्र त्यामुळे घर वाईट दिसतं व पावसाळ्यात त्यातून पाणी झिरपून भिंतींचा रंग व घराची अंतर्गत सजावट खराब होते. घर सुदृढ नसल्याचं हे एक उदाहरण आहे.

अलिकडच्या प्रकल्पांमध्ये बांधकामाची रचना भूकंपासून रक्षण करणारी (earth quake proof) असायला हवी हे पाहाणं आवश्यक झालं आहे. भूकंपापासून रक्षण करणारी म्हणण्यापेक्षा भूकंपातही टिकेल अशी (earth quake resistant) असायला हवी. इमारतींसाठीच्या आयएस कोडनुसार अनेक निकष आहेत व भूकंपाच्या शक्यतेनुसार जगाला पाच विभागांमध्ये विभागण्यात आलं आहे. पुणे त्यापैकी विभाग ३ मध्ये येतं व या विभागातील इमारतींची रचना करताना काही निकष आहेत. या निकषांचे पालन करुन तयार केलेल्या रचनेला भूकंपात टिकणारी (earth quake resistant) म्हणतात! पाय, खांब, तुळई, स्लॅब असे बांधकामाचे घटक मजबूत करण्याचा हा एक मार्ग आहे. रचना चांगली असेल तर भविष्यात घराची देखभाल कमीत कमी करावी लागेल, त्यामुळेच बांधकामाच्या वेळीच आपल्या विकासकाला चौकसपणे थोडे प्रश्न विचारण्यात काहीच गैर नाही.
घराचा ताबा घेतल्यावर घराच्या मजबुतीची जबाबदारी आपली असते. कार कितीही चांगली असली तरीही तिचे नियमितपणे सर्विसिंग करावे लागते हे आपल्याला माहिती आहेच, व त्यासाठी आपण कार नियमितपणे घेऊनही जातो, मात्र जेव्हा घराची वेळ येते तेव्हा काय? स्वतःला केवळ एकच प्रश्न विचारा की आपण आपल्या घराचे शेवटचे सर्विसिंग कधी केले? या वेड्यासारख्या प्रश्नावर बरेच जण हसतील की घराचे सर्विसिंग ही काय नवी कल्पना आहे! ही अतिशय सोपी आहे व तिच्यासाठी आपल्या कारच्या सर्विसिंगपेक्षाही कमी पैसे लागतात!
केवळ आपण ते व्यवस्थित समजून घेण्याची व त्याचे पालन करायची गरज आहे. नव्या गृहनिर्माण कायद्यामध्येही इमारतीच्या लेखा परीक्षणाची तरतूद आहे, ज्यामध्ये घर व त्याच्या सुविधांची ठराविक कालावधीने तपासणी केली जाईल. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या, snaayaU व हाडे यांचे गुंतागुंतीचे जाळे असते, त्याचप्रमाणे घराची रचनाही तशीच असते मात्र त्यासाठी वेगळ्या वस्तू वापरल्या जातात. भिंतींच्या आतून जाणा-या पाणी व वीजेच्या वाहिन्या एकप्रकारे घराच्या रक्तवाहिन्याच असतात, आतून व बाहेरुन केलेले प्लास्टर त्वचेखालील snaayaUMpa`maaNao असते, इमारतीच्या आराखड्यातील खांब व तुळई शरीरातील हाडांप्रमाणे असतात. ज्याप्रमाणे आपल्या शरीराची रोज झीज होत असते, त्याप्रमाणे घर बांधतानाही अनेक गोष्टी घडत असतात ज्यामुळे हे घटक कमजोर होतात. जशी आपल्याला नियमित वैद्यकीय तपासणीची गरज असते, तशीच घराचीही तपासणी व प्रतिबंधक उपाय आवश्यक असतात. हे उपाय मानवी शरीराइतके वारंवार करावे लागत नसतील तरीही दुर्दैवाने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

आपण घराच्या बाहेरच्या भिंतींवर एसी लावतो व त्याचे पाईप व तारा आत आणण्यासाठी भिंतीला भोके पाडतो. असे करताना आपण भिंतीचे बांधकाम व प्लास्टरला नुकसान पोहोचवू शकतो, ज्यामुळे संपूर्ण प्लॅस्टरला तडे जाऊ शकतात, ज्यामुळे ते सैल होऊन खाली पडू शकते किंवा पावसाळ्यात पाणी झिरपून भिंतीला ओल लागू शकते. आपल्या खोलीला लागून गच्ची असते, त्यातील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेले पाईप आपण क्वचित साफ करतो त्यामुळे त्यात साचलेले पाणी गच्चीतून आपल्या भिंतींमध्ये झिरपते. आपली वीजेच्या तारा आपण वेळोवेळी तपासत नाही, त्यातल्या काही तुटल्या असतील तर काही वर्षांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते. ब-याच घरांमध्ये आजकाल पाईपद्वारे गॅस पुरवला जातो, मात्र त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते व आपण गॅस गळती किंवा स्फोटाच्या बातम्या वाचतो! आपण शौचालयातील कमोड किंवा इतर साधने तसेच भिंतींच्या टाईल्स बदलतो. या प्रक्रियेमध्ये आपण शौचालयाच्या तळाचे वॉटर प्रूफिंग तोडतो, त्यामुळे खालच्या सदनिकेमध्ये खाली पाणी गळते किंवा आपण गच्चीवर सौर उपकरणे बसवतो, त्यामुळे गच्चीचे वॉटर प्रूफिंगचे नुकसान होते व पावसाळ्यात सर्वात वरच्या मजल्यावरील सदनिकेत पाणी गळते! सदनिका ताब्यात घेतल्यानंतर आपण बाल्कनी, ग्रिल, अल्युमिनियमच्या स्लाइडिंग खिडक्या वगैरे लावून बंद करुन टाकतो, त्यासाठी आवश्यक ती सर्व तोडफोड करतो, मात्र पुन्हा त्याठिकाणी व्यवस्थित प्लास्टर करत नाही, रंग वगैरे देणं दूरच राहिलं. आपण गच्चीवर कापडी आच्छादन (कॅनपी) घालतो, ते दिसायला चांगलं दिसतं, मात्र आपण ते कसं बसवतो याकडे कधी लक्ष देतो का?  कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, ज्यामुळे या प्रक्रियेत आपल्या घराचीही झीज व नुकसान होते.
आपण ठणठणीत असतो तेव्हा कधीच तपासायला जात नाही मात्र जेव्हा आपल्याला काही आजार होतो तेव्हा आपण आपल्या शरीराकडे लक्ष देतो, घराच्या विविध यंत्रणांची व घरात वापरल्या जाणा-या साधनांची वेळोवेळी तपासणी करायला हवी. यावरचा उपाय म्हणजे लिफ्ट, पाण्याचे पंप, जनरेटर, सोलर वॉटर हिटर्स, पाणी शुद्धीकरण प्रकल्प व इतरही कुठलेही घटक जे आपल्याला २४ तास आवश्यक आहेत त्यांच्या देखभालीचे वार्षिक कंत्राट द्यावे ज्यामुळे आपले जीवन खरंच आरामदायक होईल. ब-याच गृहनिर्माण संस्था अशा चांगल्या पद्धतींचा अवलंब करत नाहीत, किंबहुना त्या देखभालीचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न करतात व आपण लिफ्ट खराब झाल्यामुळे अपघात झाल्याचं किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं वाचतो! बाजारात या सेवा देणा-या संस्था आहेत, लिफ्ट किंवा जनरेटरच्या देखभालीच्या बाबतीत शक्यतो अधिकृत सेवा पुरवठादारांकडेच जाणेच योग्य ठरेल, मग ते थोडे महाग असले तरीही.
आपल्या स्वतःच्या सुदृढतेप्रमाणेच, सुदृढ घरही तेवढंच महत्वाचं आहे; कारण तरच आपल्याला माया अँजेलोने म्हणल्याप्रमाणे त्या घरात सुरक्षित वाटेल AaiNa त्यासाठी ते बिचारं घर स्वतः काही करु शकत नाही, घरात राहणा-या व्यक्तिलाच त्याची काळजी घ्यावी लागते; आपण ज्या चार भिंतींना घर म्हणतो त्यांच्याबद्दल आपली ही जबाबदारी आहे!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!

शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx


हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

No comments:

Post a Comment